कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती होती पण रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केला. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अशा स्थितीत जनतेला काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशात देखील सरकारकडून विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे तसेच अनेक विभागांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधीची घोषणा देखील केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:29 PM 08-Mar-21
