‘बीसीसीआय’नं जाहीर केलं आयपीएल 2021चं वेळापत्रक

0

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगचं संपूर्ण १३वं पर्व यूएईत खेळवल्यानंतर आयपीएलचं भारतात पुनरागमन होत आहे. बीसीसीआयनं रविवारी आयपीएल 2021चं वेळापत्रक जाहीर केलं. ९ एप्रिल ते ३० मे या कालावाधीत आयपीएलचे सामने होणार आहेत. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेन्नईत सलामीचा सामना रंगणार आहे. देशातील कोरोना परिस्थिती पाहता, स्टेडियमवर प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली आहे. मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, दिल्ली आणि बंगळुरू या सहा शहरांमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्यात येणार आहेत. आयपीएलच्या १४ व्या पर्वातील पहिले ३६ सामने चेन्नई, अहमदाबाद, मुंबई व दिल्ली येथे होतील आणि उर्वरित २० सामने बंगळुरू व कोलकाता येथे होतील. पश्चिम बंगालमध्ये मार्च अखेरीस ते एप्रिल अखेरीस निवडणुका असल्यानं हा निर्णय घेण्यात आला.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तीन सामन्यांसाठी ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियमवर उपस्थिती देण्यात आली होती. पण, आयपीएलमध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली नाही. कारण, द्विदेशीय देशांमध्ये ही लीग होणार नसून ८ फ्रँचायझी खेळणार आहेत, त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला गेला आहे. दोन संघांचं बायो-बबलचे नियोजन सहज करता येते, परंतु ८ संघाचे थोडे अवघड आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:32 PM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here