इस्रोने चांद्रयान २ च्या ऑर्बिटरच्या कॅमेऱ्यातून टिपलेली चंद्राची छायाचित्रे

0

बंगळूर : इस्रोने चांद्रयान २ च्या ऑर्बिटरच्या कॅमेऱ्यातून टिपलेली चंद्राची छायाचित्रे सोशल मीडियाच्‍या माध्‍यामातून प्रसिद्ध केली आहेत. ऑर्बिटरच्या हाय रिझोल्यूशन कॅमेऱ्यातून ही छायाचित्रे काढण्‍यात आली आहेत. या कॅमेर्‍यातुन चंद्राची वेगळी झलक पाहायला मिळत आहे. यापूर्वी देखील इस्रोने ऑर्बिटरमधून काढलेल्या छायाचित्रांद्वारे विक्रम लँडर नेमके कुठे आहे, त्‍याची माहिती सांगितली होती. सात सप्टेंबरला विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिग होऊ शकले नव्‍हते. विक्रमचा इस्रोशी संपर्क तुटला होता. नंतर लँडरचे हार्ड लँडिंग झाल्याचे नासा आणि इस्रोच्या वैज्ञानिकांनी स्पष्ट केले होते. आताही चंद्राच्या कक्षेत चांद्रयान २ चं ऑर्बिटर आहे, जे साडेसात वर्षांपर्यंत आपले काम करत राहणार आहे. याच ऑर्बिटरच्या कॅमेऱ्यातून चंद्राची नवी छायाचित्रे समोर आली आहेत. ‘चांद्रयान २’ ही इस्रोची अतिशय महत्त्वाची मोहीम होती. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील भागाचा अभ्यास करण्यासाठी ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर एकत्र पाठवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर विक्रमच्या लोकेशनबाबत माहिती मिळाली होती. ऑर्बिटरने विक्रम लँडरची एक थर्मल इमेज क्लिक केली होती. मात्र नंतर चंद्रावर रात्र झाल्यानंतर इस्रोच्या लँडर विक्रमशी संपर्क होण्याच्या आशा मावळल्या होत्‍या. इस्रोचे प्रमुख के. सिवन म्हणाले होते की,  चांद्रयान ऑर्बिटरचं वय साडे सात वर्षांहून अधिक आहे. आधी सांगितल्याप्रमाणे एक वर्ष नव्हे. त्यामुळे यानात खूप जास्त इंधन वाचलेले आहे. ऑर्बिटरवर लागलेल्या उपकरणांच्या आधारे लँडर विक्रमचा ठिकाणाची माहिती मिळणे शक्‍य झाले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here