मार्गताम्हाने येथे हातभट्टीवर धाड; दीड लाखांचा ऐवज जप्त

0

चिपळूण : तालुक्यातील मार्गताम्हाने धरणवाडी येथे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांनी धाड टाकून हातभट्टी उद्ध्वस्त केली यामध्ये दीड लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल मनोज कळे यांनी फिर्याद दिली असुन त्यानसार, प्रवीण उर्फ पद्मा बाळकृष्ण चव्हाण, संदीप महादेव घाणेकर (४७), सुधीर सिताराम घाणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही धाड दि. ६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास टाकण्यात आली. मार्गताम्हाने येथील जंगलामध्ये गावठी दारू गाळत असताना पोलिसांनी धाड टाकली व यामध्ये १ लाख ४८ हजार ८०० रूपये किंमतीचे रसायन, ३ हजार रूपयांची साठ लीटरची गावठी दारू, ३ हजार रूपयांचा २०० किलो काळा गुळ जप्त केला असून पोलिसांनी रसायनाच्या टाक्या नष्ट केल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:41 PM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here