रत्नागिरी : आजच्या बजेट मध्ये सिंधुदुर्गा सकट 7 जिल्ह्यांना वैद्यकीय महाविद्यालयाची मंजुरी मिळाली मात्र सिंधुदुर्ग आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याला वंचित ठेवण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात मेडिकल कॉलेज होणार अशी घोषणा झाली होती. मात्र प्रत्यक्षात रत्नागिरी आपली राजकीय जहागिरी आहे असं मानणाऱ्या सत्ताधीशांनी रत्नागिरीला मेडिकल कॉलेज पासून वंचित ठेवलं. राणे साहेबांनी सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज काढून आपल्या मातृजिल्ह्यासाठी आपलं दायित्व पूर्ण केलं. त्याचा राग धरत आणखी एक कॉलेज सिंधुदुर्गात बालिश राजकारणाचा नमुना म्हणून मंजूर करून या राजकीय अट्टाहासात रत्नागिरी वर अन्याय करण्यात आला. रत्नागिरीच्या युवकांचे भविष्य मातीमोल करण्याचं कुटील कारस्थान रत्नागिरीकरानी ओळखावं. रत्नागिरीतल्या औद्योगिक प्रकल्पना विरोध, रत्नागिरीतील शैक्षणिक सुविधा बाबत नकारात्मकता, पर्यटनाच्या बाबत धोरणातील विसंगती, अंबा जागतिक दर्जाचे फळ असून त्या व्यवसायाला चालना देणारी धोरण न राबवणे, काजू उत्पादकांच्या काजू प्रक्रिया उद्योगाच्या अडचणीन कडे सातत्याने दुर्लक्ष. असे धोरण या राज्य शासनाचे आहे. मंजूर झालेली पाणी योजना पूर्ण करण्यातील नकारात्मक अकार्यक्षमता याचा अनुभव रत्नागिरीकर घेत आहेतच. वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीसाठी मंजूर न करण्या मागे राजकीय दुर्बल मानसिकता आणि बालिश अपरिपक्व राजकीय नीती याचा रत्नागिरी भाजपा तीव्र निषेध करतो, असे भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:54 PM 08-Mar-21
