वाकवली येथे घरफोडी, दीड लाखाचा ऐवज लांबवला

0

जालगाव : तालुक्यातील वाकवली येथील एका बंद घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सुमारे १ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून, येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकवली येथील रिया सुरेंद्र महाडीक (३८) या आपल्या परिवारातील सदस्यांसह बाहेर गावी गेल्या असता २८ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० ते११.४५ वा. सुमारास त्यांच्या शिरशिंगे फाटा, वाकवली येथील घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून ४५ हजार रु. किमतीचा सोन्याचा हार, ४५ हजार रुपये किमतीची अंगठी, १५ हजार रु. कानातील बटन, ९ हजार रु. कानातील टॉप,६ हजार रु. कानातील टॉप,६ हजार रु.कानातील ड्रल, ३ हजार रुपयांचा सोन्याचा वळा,३००० रु. कानातील रिंग, १५ हजार रु मोती घालून केलेली सोन्याची नथ, १५ हजार रुपये किमतीची अंगठी आणि ६ हजार रुपये किमतीचे सुवर्ण पान असे सुमारे १ लाख ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. ही घटना दि ५ रोजी उघडकीस आली असून दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:12 PM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here