रत्नागिरी जिल्हास्तरीय सायक्लोथॉन स्पर्धेवर चिपळूणचे वर्चस्व

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हास्तरीय सायक्लोथॉन स्पर्धेवर चिपळूणच्या सायकलपटूंनी वर्चस्व राखले. विक्रांत आलेकर सुवर्णपदक विजेता ठरला. स्पर्धेत चिपळूण, खेड, रत्नागिरी, दापोली, गुहागर आणि देवगड तालुक्यातील ४० सायकलपटूंनी सहभाग घेतला. विक्रांत आलेकर यांनी स्पर्धेचे ७२ किलोमीटरचे अंतर ३ तास ४ मिनिटांत पार केले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ‘सायकलिंग करा, तंदुरुस्त राहा, प्रतिकारशक्ती वाढवा आणि रोगमुक्त व्हा’ हा संदेश देत जिल्ह्यातील पहिली सायक्लोथॉन सुवर्णसूर्य फाउंडेशनने आयोजित केली होती. हेदवी (ता. गुहागर) ते राई-भातगाव पूल मार्गे गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) मार्गावरच्या या सायक्लोथॉनला चांगला प्रतिसाद मिळाला. गुहागर येथील हेदवी गणपती मंदिराचे अध्यक्ष डॉ. जोगळेकर, सेक्रेटरी प्रसाद ओक, सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी आणि संचालिका तेजा देवस्थळी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून या सायक्लोथॉनला हिरवा झेंडा दाखवला. मार्गावरील २७ गावांमध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती झाली. स्पर्धेत चिपळूण सायकल क्लबच्याच आकाश लकेश्री यांनी ३ तास ५ मिनिटे आणि प्रसाद आलेकर यांनी ३ तास ६ मिनिटांत अंतर पार करून अनुक्रमे रौप्य आणि कास्य पदक मिळवले. विजेत्यांना अनुक्रमे ५००१, ३००१ आणि २००१ रुपयांची बक्षिसे देण्यात आली. दापोलीच्या मोहिनी पाटील आणि मिलिंद खानविलकर, गुहागरच्या अनंत तानकर यांना १००१ रुपये आणि पदक हे उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कोरोनाविषयक सर्व निर्बंध पाळून, सर्व शासकीय परवानग्या घेऊन आयोजित केलेल्या या सायक्लोथॉनच्या आयोजनावर सर्व स्पर्धकांनी समाधान व्यक्त केले. गणपतीपुळ्याच्या महालक्ष्मी हॉल येथे सायक्लोथॉनचे बक्षीस वितरण झाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:27 PM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here