भगवती बंदर येथे ‘क्रुझ टर्मिनल’ उभारणीसाठी 100 कोटींची तरतूद

0

रत्नागिरी : जिल्ह्याला जलपर्यटनाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्याअनुषंगाने हालचाली सुरू झाल्या असून येथील भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पुण्याची सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च सेंटर (सीडब्ल्युपीआरएस) आणि या प्रकल्पाची सल्लागार कंपनी असलेल्या ‘फॅक्ट’च्या अधिकार्‍यानी चार दिवस पाहणी केली. त्यामुळे अलिशान क्रुझला रत्नागिरीत थांबा मिळणार हे निश्‍चित झाले आहे. मांडवी पर्यटन संस्थेने देखील हे टर्मिनल व्हावे, यासाठी मागणी लावून धरली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या क्रुझ टर्मिनल साठी 100 कोटीच्या अर्थसहायाची तरतुद करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केल्याने कोकणाच्या पर्यटन वाढीच्यादृष्टीने हा सर्वांत मोठा निर्णय आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:17 AM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here