कळंबस्ते येथे चोरट्याने दीड लाखाचे दागिने लांबविले

0

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते मुस्लिम मोहल्ल्यातील एका महिलेच्या घरातून तब्बल १ लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. संगमेश्वर पोलिस ठाण्यातून मिळालेल्यामाहितीनुसार बिलकीश कमाल बोट (५८, रा. कळंबस्ते) या आपल्या दोन सुनांसह कळंबस्ते मुस्लिम मोहल्ला येथे राहतात. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवून त्या झोपी गेल्या होत्या. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून पेटीत ठेवलेले ३ तोळ्यांचे ७५ हजार किमतीचे मंगळसूत्र, २ तोळ्यांचा ५० हजार किमतीचा सोन्याचा हार व १ तोळ्याचे १२ हजार ५०० रुपये किंमतीचे लेडीज ब्रेसलेट असे सोन्याचे दागिने लंपास आहेत. बिलकीश बोट या सकाळी ५.४५ वाजता उठल्या असता त्यांना हा चोरीचा प्रकार लक्षात आला. याबाबत त्यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एस. वाय. नेवरेकर करीत आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here