महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत

0

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेहमी कोणत्या न कारणाने चर्चेत असतात. आता भगतसिंह कोश्यारी यांची थेट मुख्यमंपदी वर्णी लागू शकते. सध्या उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता आहे. सध्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्याविरूद्ध भाजप आमदारांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा होऊ शकते अशी चिन्हे दिसत आहे.

उत्तराखंडचे अनेक आमदार आणि मंत्री सध्या दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत. रावत यांना पक्षनेतृत्वाकडून राजीनामा देण्यास सांगितलं असल्याची माहिती समोर येत आहे. परंतू आणखी याबद्दल अधिकृत घोषणा झाली नाही. रावत यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्याशी चर्चा केली आहे. तर दुसरीकडे दोेन दिवसांपूर्वी पक्ष नेतृत्वाने रमणसिंग आणि दुष्यंत गौतम यांना उत्तराखंडच्या दौऱ्यावर पाठवलं होतं. त्यांनी 45 आमदारांशी चर्चा केल्याचं समजतंय. त्यानंतर त्यांनी आपला अहवाल राष्ट्रीय कार्यकारणीकडे दिला. त्यानंतर आज अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतील, अशी माहिती आहे. दरम्यान, या सर्व घडामोडीत भगतसिंग कोश्यारी यांना मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी देण्यात येऊ शकते. उत्तराखंडची स्थापना झाल्यानंतर आतापर्यत फक्त एकाच मुख्यमंत्र्याला 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला आहे. तर कोणताही मुख्यमंत्री न बदलता पुढील निवडणुक लढवण्याची पद्धत आहे. त्यामुळे आता भाजप काय निर्णय घेईल याची प्रतिक्षा असेल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:47 AM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here