मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज (९ मार्च) १५ वा वर्धापन दिन आहे. या वर्धापदिनानिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून वर्धापन दिनाचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील माझ्या सर्व सहकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा,’ असे ट्वीट राज ठाकरेंनी केले आहे. तसेच राज ठाकरेंनी या ट्वीट केलेल्या फोटोत किल्ल्याचा बुरुज पाहायला मिळत आहे. त्याला फुलांच्या रंगेबेरंगी माळांनी सजवण्यात आले आहे. तसेच नुकताच होणारा सूर्यादय आणि आकाशात उंच भरारी घेणारा एक पक्षी दिसत आहे. या फोटोवर १५ वा वर्धापन दिन, तमाम महाराष्ट्र सैनिकांना मन:पूर्वक शुभेच्छा असे लिहिण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:47 AM 09-Mar-21