पन्नासहून अधिक सभासद असलेल्या संस्थांनी ऑनलाइन सभा घ्याव्यात

0

रत्नागिरी : पन्नासहून अधिक सभासद असलेल्या सहकारी संस्थांना प्रत्यक्ष उपस्थिती न ठेवता ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचे निर्देश सहकार आयुक्तांनी दिले आहेत, अशी माहिती स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली. सहकार आयुक्तांनी सोमवारी याबाबतचे निर्देश दिले आहेत. पन्नासपेक्षा अधिक सभासद असलेल्या सर्व संस्थांनी येत्या ३१ मार्चपर्यंत वार्षिक सभा ऑनलाइन घ्याव्यात. त्यासाठी संस्थेत यासंदर्भात तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे अथवा बाहेरची एजन्सी नेमून ऑनलाइन सभा आयोजित करावी, असे निर्देशात म्हटले आहे.

सभेची विषयसूची नोटीस सभासदांना संस्थेकडे नोंदलेल्या ई-मेल अॅड्रेस, मोबाइल नंबरवर एसएमएस अथवा व्हॉट्सअॅपद्वारे सात दिवस अगोदर पाठवण्याची सूचना आहे. तसेच पतसंस्थांच्या नोटीस बोर्डावर एक आणि एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करायची आहे. सर्व सभासदांपर्यंत सभेची माहिती आणि ऑनलाइन सभेची लिंक पोहोचवण्याची जबाबदारी संस्थेची राहणार आहे. पतसंस्थांना आता ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन सभा आयोजित करणे अनिवार्य होणार आहे. मुदतवाढ मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती दीपक पटवर्धन यांनी दिली. याबाबतच्या परिपत्रकाची प्रत आपल्याकडे उपलब्ध आहे, असेही श्री. पटवर्धन म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:12 PM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here