खेड-भरणे मार्गावर दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू

0

खेड : खेड-भरणे मार्गावर अण्णाचा पऱ्या या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने टाकलेल्या मोठा गतिरोधकावर सकाळी दुचाकीवर मागे बसलेली महिला तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी झाली. उपचारासाठी नेत असतानाच तिचा मृत्यू झाल्याची घटना ८ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार निर्मला जंगम (४० राहणार शिंदी जि.सातारा) ही महिला आपल्या नातेवाईकसोबत खेडमध्ये आली असता दुचाकीवरून स्वाराच्यामागे बसून खेडकडे येत असताना खेड-भरणे मार्गावरील एका मोठ्या गतिरोधकावरून जाताना दुचाकीवरुन ती पडली. तिला तत्काळ रुग्ण वाहिकेने खेडमधील एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, त्या आधीच त्या महिलेची प्राणज्योत मालवली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:42 PM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here