भगवंतालाही फसवणारा अर्थसंकल्प : आचार्य तुषार भोसले

0

मुंबई : विधानसभेत सोमवारी (८ मार्च) उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावर सडकून टीका करताना भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी हा भगवंतालाही फसवणारा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे.

तुषार भोसले आपल्या प्रसिध्दीपत्रकात नेमके काय म्हणाले ?
1) महाराष्ट्रातल्या पुरातन आणि शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या मंदिरांच्या संवर्धनासाठी या सरकारने प्राचीन मंदिर संवर्धन योजना जाहीर केली तर आम्ही याचे स्वागत केले होते. परंतु आजच्या अर्थसंकल्पात या योजनेत राज्यभरातून फक्त ८ मंदिरे निवडली गेली. हे म्हणजे खोदा पहाड और निकला चूहा यासारखेच आहे. ही तर भगवंताची सुद्धा फसवणूक आहे.
आणि त्यातही फक्त ८ मंदिरांसाठी १०१ कोटी रुपयांची तरतूद म्हणजे देवाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे कुरण तयार करुन ठेवण्यात आले आहे.
2) वारंवार मागणी करुनही संत नामदेव महाराजांच्या ७५० व्या जयंती निमीत्ताने कोणताही सरकारी कार्यक्रम नाही, वारकरी, प्रबोधनकार यांना पुरस्काराची योजना नाही. पंढरपूर येथे संत नामदेवांच्या नावे संतपीठ उभारण्याची पण मागणी मान्य न करता फडणवीस सरकारने निधी देऊन सुरु केलेल्या नरसी नामदेव क्षेत्राला निधी देऊ असे सांगून फसविण्यात आले.
3) तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत कोणत्याही नव्या तिर्थक्षेत्राचा समावेश न करता फडणवीस सरकारच्या काळात सुरु झालेल्या आणि मा. सुधीर मुनगंटीवार यांनी भरीव निधी दिलेल्या तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांचीच यादी यावेळी वाचण्यात आली. त्यामुळे ठराविक निधी जाहीर न करता केवळ निधी देऊ असे सांगून तिर्थक्षेत्रांचीही फसवणूक करण्यात आली.
4) संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानकाका, संत मुक्ताई , संत सावता महाराज यांचे ७२५ वे समाधी वर्ष आहे, या निमीत्ताने या संतश्रेष्ठांच्या समाधी स्थळांच्या विकासासाठी निधी देणे तर दूरच मात्र या संतांचा साधा नामोल्लेख देखील अर्थसंकल्पात झाला नाही.
एकूणच आध्यात्मिक क्षेत्राचा उपहास करणारा अर्थसंकल्प ठाकरे सरकारने मांडला आहे, अस त्यांनी म्हटलं आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:51 PM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here