महिलेला सासरी झालेल्या मारहाणीसाठी पतीच जबाबदार : सर्वोच्च न्यायालय

0

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी एका व्यक्तीची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली आहे. या व्यक्तीवर आपल्याच पत्नीला मारहाण करण्याचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं, की पत्नीला झालेल्या कोणत्याही दुखापतीसाठी पती स्वतःच जबाबदार असेल. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं म्हटलं आहे की, सासरच्या घरात कोणी दुसर्‍या नातेवाईकानंही महिलेवर हल्ला केला, तरी तिची प्राथमिक जबाबदारी पतीवर असेल.

सर्वोच्च न्यायालय ज्या प्रकरणार सुनावणी करत होतं, त्या संबंधीत पुरुषाचं हे तिसरं तर महिलेचं दुसरं लग्न होतं. लग्नाच्या एक वर्षानंतर 2018 मध्ये या दाम्पत्याला एक मुल झालं. गेल्या वर्षी जूनमध्ये स्वत: वर झालेल्या कथित हल्ल्यानंतर या महिलेने तिचा नवरा, सासरा आणि सासू विरोधात लुधियाना पोलिसांत तक्रार दिली. सासरचे लोक हुंड्यासाठी आणखी हुंडा मागत असल्याचा आरोप या महिलेने केला होता. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांच्या खंडपीठासमोर महिलेच्या पतीचे वकील कुशाग्र महाजन अटकपूर्व जामीनाच्या मागणीवर ठाम राहिले. त्यासंदर्भात सीजेआयच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं म्हटलं की, ‘तुम्ही नेमके कोणत्या प्रकारचे मनुष्य आहात? तुम्ही पत्नीचा गळा दाबून तिची हत्या करणार होते, असा तिनं आरोप केला आहे. तुम्ही तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं असल्याचाही आरोप तिने केला आहे. आपण कोणत्या प्रकारचे मनुष्य आहात की आपण आपल्या पत्नीला मारहाण करण्यासाठी क्रिकेट बॅट वापरता? महाजन यावर बोलताना म्हणाले, की महिलेनं पतीच्या वडीलांवर आरोप लावला आहे, की त्यांनी तिला बॅटनं मारलं. यावर सीजेआय म्हणाले, की या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही, की महिलेला बॅटनं मारहाण तुम्ही केली की तुमच्या वडीलांनी. जेव्हा एखाद्या महिलेला तिच्या सासरी असताना दुखापत किंवा मारहाण होतो, तेव्हा ही पूर्ण प्राथमिक जबाबदारी तिच्या पतीची आहे. यानंतर न्यायालयानं महिलेच्या पतीची याचिका फेटाळली. याआधी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानंही पतीला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:49 PM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here