‘डेरवण यूथ गेम्स’चे २४ ते ३१ मार्चदरम्यान आयोजन

0

चिपळूण : डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरीटीज ट्रस्टतर्फे सलग सातव्या वर्षी ‘डेरवण यूथ गेम्स’ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २४ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत शिवजयंतीनिमित्त या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
डेरवणमधील विठ्ठलराव जोशी चॅरीटीज ट्रस्टच्या भव्य क्रीडासंकुलात १८ खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कॅरम, तसेच देशी खेळांना प्रोत्साहन देण्याकरीता लंगडी, खोखो, कबड्डी, मल्लखांब, बास्केटबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल या खेळांचा समावेश स्पर्धेत आहे. ऑलिम्पिकमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेला वॉल क्लाइंम्बिंग या प्रकारातही साहसी खेळाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भारतीय खेळ आणि ऑलिम्पिक खेळांचा संगम असणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील पाच हजारापेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना पदके, चषक तसेच एकूण १२ लाखांहून अधिक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. विजेत्यांना ९०० पदके, ५० करंडक बक्षीस पाने देण्यात येणार आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेण्याचे निश्चित केले आहे. विविध क्रीडाप्रकारांत राज्यातील खेळाडूंचा चित्तथरारक खेळ कोकणवासीयांना या स्पर्धेनिमित्ताने पाहण्याची पर्वणी मिळणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन २४ मार्च रोजी समारंभपूर्वक होईल. समारोप शिवजयंतीच्या दिवशी ३१ मार्चला करण्यात येईल. स्पर्धेच्या काळात क्रीडाक्षेत्रातील रोजगाराच्या संधी, डोपिंग शाप की वरदान तसेच ऑलिम्पिक विषयावर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धेच्या प्रत्येक दिवशी संध्याकाळी क्रीडा मानसतज्ज्ञ, आहार तज्ज्ञ तसेच प्रशिक्षक आणि राष्ट्रीय खेळाडूंचा परिसंवाद आणि मुलाखतीही होणार आहेत. स्पर्धेत ८ वर्षे ते १८ वर्षे वयापर्यंतचे खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यासाठी २२ मार्चपर्यंत प्रवेश नोंदणी सुरू राहणार असून ऑनलाइन नोंदणी www.svjctsportsacademy.com या संकेतस्थळावर सुरू झाली आहे. स्पर्धेच्या नोंदणीकरिता ९८२२६३९३०६, ९३२५८९७८७७, ९८२२००१६९२, ९२२५६५०२६४ या मोबाइलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:20 PM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here