मुंबई : आमचा विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला आहे. त्यामुळे याच अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक झाली पाहिजे. त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी एका दिवसाने वाढवण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीनंतर नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधला. विधानसभा अध्यक्ष निवडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यात निर्णय होईल. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडला जावा हा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी एक दिवसाने अधिवेशन वाढवावे अशी आमची मागणी आहे, असं सांगतानाच आमचा अध्यक्षपदाचा उमेदवारही ठरलेला आहे, असं पटोले म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:23 PM 09-Mar-21
