जैतापूर येथे प्रौढाची गळफास घेत आत्महत्या

0

राजापूर : तालुक्यातील जैतापूर बाजारपेठ येथील राजेश नारकर यांनी अज्ञात करणातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. नारकर यांचा मृतदेह सडलेल्या स्थितीत आढळून आला असून सुमारे १५ दिवसांपूर्वी त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांतून वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी नाटे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश नारकर (४५) हे जैतापूर बाजारपेठेतील जुन्या घरात एकटेच राहत होते. सोमवारी त्यांची आई व बहीण घरात साफसफाई करण्यासाठी आल्या असता त्यांना घरात कुजकट वास आला. त्यामुळे त्यांनी घरातील खोल्यांमध्ये शोध घेतला असता जेवणाच्या खोलीत राजेश यांचा मृतदेह लटकताना दिसला. याबाबत अधिक पोलीस तपास सुरु आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:46 PM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here