मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणात केलेल्या आरोपांमुळे सत्ताधारी महाविकासआघाडीची कोंडी झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सभागृहात हिरेन मनसुख यांची पत्नी विमला मनसुख यांच्या तक्रारीची प्रत आणि कॉल डिटेल्स रेकॉर्डच्या (CDR) आधारे या प्रकरणातील तपास अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले.
उपलब्ध पुरावे हे सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुरेसे आहेत. त्यामुळे सचिन वाझे यांना बडतर्फ करून त्यांचा तात्काळ अटक करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांच्या या मागणीनंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडले. तेव्हा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला. मुळात देवेंद्र फडणवीस यांना कॉल डिटेल्स रेकॉर्ड कसे मिळाले, त्यांना ते मिळवण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला. नाना पटोले यांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस ताडकन उभे राहिले आणि सरकारने माझी चौकशी करावीच, असे खुले आव्हान दिले. मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी करा. पण खून केला त्याला पाठिशी का घालता? तुम्ही मला चौकशी लावण्याची धमकी देत आहात का? सभागृहात बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे. तुम्ही माझी चौकशी लावा. मात्र, याप्रकरणात तुम्ही शोधणार नाही, त्यापलीकडची माहिती मी मिळवून दाखवतो, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला ललकारले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:01 PM 09-Mar-21