काळ्या पाण्याच्या सुटकेची शंभरी साजरी करण्यासाठी आवाहन

0

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या नेतृत्वाखाली काळ्या पाण्याच्या सुटकेची शंभरी साजरी करण्याचा आणि त्यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर ज्योत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सर्व राष्ट्रभक्त नागरिकांनी एकत्र यावे, यासाठी राज्यभरातील प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना १९२१ साली अंदमानातून रत्नागिरीला आणण्यात आले. अंदमानाच्या नरकातून जिवंतपणी बाहेर येण्याचा चमत्कार २ मे १९२१ या दिवशी या क्रांतिकारकाने घडवला. त्यानंतर अलीपूर, येरवडा आणि रत्नागिरीतील तुरुंगवास तसेच स्थानबद्धतेमुळे त्यांच्या कार्यात थोडेसे अडथळे आले. पण हा द्रष्टा नेता त्याही काळात देशकार्यासाठी झटत राहिला. स्वातंत्र्यवीरांसारखी भारतरत्ने फारच कमी असून त्यांचे कर्तृत्व जनतेपर्यंत इतिहासाच्या रूपाने पोहोचविण्यात आपण कमी पडलो आहोत. त्याला राजकीय अभिनिवेषाचे अडथळे असले, तरी जनतेने स्वातंत्र्यवीर ठरविलेल्या या महान क्रांतिकारकाचा यथोचित सन्मान वेळोवेळी होत राहिला. स्वातंत्र्यवीर २ मे या दिवशी अंदमानातून पुन्हा स्वदेशी परतले, त्यानिमित्ताने काळ्या पाण्याच्या सुटकेची शंभरी हा कार्यक्रम हाती घेऊन जनतेमध्ये त्यांच्या कार्याचे स्फुल्लिग चेतवण्याचा पुन्हा प्रयत्न करणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन कार्यक्रम आखण्यात आला आहे. देशभरातील तरुणाईला या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांबरोबरच इतर क्रांतिकारकांच्या क्रांतीकार्याची पूर्ण महती कळावी आणि खरा इतिहास समोर यावा, हा उद्देश आहे. तसेच देशभरातील हिंदुत्ववादी संघटनांनी यानिमित्ताने एकत्र यावे, हाही मानस यामागे आहे. तो साध्य करण्यासाठी सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे. २ मे ते १२ मेपर्यंत होणाऱ्या कार्यक्रमात मुंबईत ८ मे रोजी वीर सावरकर ज्योतीचे स्वागत जल्लोषात केले जाणार आहे. कार्यक्रमाची रूपरेषा ग्रुपमध्ये सहभागी झाल्यावर देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात भाग होऊ इच्छिणाऱ्यांनी आपल्या विभागात त्यासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तींशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरी विभागातील इच्छुकांनी पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब परुळेकर (९४२२०५२३२९) यांच्याशी संपर्क साधावा.
राज्यातील इतर व्यक्ती आणि संपर्क क्रमांक असे – स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई (०२२-२४४६५८७७, ९२२००७०३८६), मुंबई – अस्मिता गोखले (९९६९५२९७७५), पुणे – चंद्रशेखर साने (९८२३१४५९४०), सारंग कुलकर्णी (९८९०६५७७९४), प्रांजल अक्कलकोटकर (८८८८२६४६०३), नाशिक – राजेंद्र देशपांडे (९८६९४६२७४७), योगेश सुकडे (९७३००२३६०१), भगूर – प्रसाद धोपावकर (९८५०४४७९३२), भूषण कापसे (९८८१७८३३२३), मनोज कुंवर (९९२१४६९००८), कोल्हापूर – अभय देशपांडे (९८२२१९०८८०).

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:42 PM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here