रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथे बेकायदेशिरपणे जुगाराचा खेळ चालवून नागरिकांकडून पैसे स्विकारल्याप्रकरणी प्रौढाला अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवार ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३५ वा.सुमारास घडली. त्याच्याकडून ४१४ रुपये आणि जुगाराचे साहित्यही जप्त करण्यात आले. शरण अंकुश पाटील (५०, रा.भंडारवाडा रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी शरण पाटील हा भंडारवाडा येथील पडक्या झोपडीच्या बाजूला गैरकायदा व विनापरवाना मटका जुगाराच्या आकड्यांवर नागरिकांकडून पैसे स्विकारत असताना ही कारवाई करण्यात आली. या संदर्भात अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.
