भाजप संसदीय दलाची उद्या बैठक

0

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने संसदीय दलाची बैठक बुधवार 10 मार्च रोजी संसद भवन परिसरात आयोजित केली आहे. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा ,संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, व्ही मुरलीधरन, अर्जुन मेघवाल नितीन गडकरी, थावरचंद गेहलोत, निर्मला सीतारामण यांच्यसह दोन्ही सभागृहातील खासदार यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्प, पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक तसेच अन्य विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु असून 8 एप्रिल पर्यंत चालणार आहे. पहिला भाग 13 फेब्रुवारीला समाप्त झाला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:06 PM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here