‘नासा’च्या हबल दुर्बिणीने टिपले सुंदर आकाशगंगेचे छायाचित्र

0

न्यूयॉर्क : ‘नासा’च्या हबल या दुर्बिणीतून आकाशगंगेचे सुंदर छायाचित्र टिपण्यात आले आहे. यातून भव्य आकाशगंगेचा पूर्ण आकार आणि सौंदर्य दर्शविला गेला आहे. हा आकाशातील एक नजराणा आपल्या डोळ्यांना सुखद धक्का देत आहे. ‘नासा’ने हे सुंदर आकाशगंगेचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.

या निळ्याशार आकाशगंगेचे नाव ‘एनजीसी 2336’ असे आहे. हबल या अंतराळ दुर्बिणीने हे अनोखे आणि आकर्षक छायाचित्र टिपले आहे. या आकाशगंगेचा शोध सर्वप्रथम 1876 मध्ये जर्मन खगोलशास्त्रज्ञ विल्हेम टेम्पेल यांनी लावला होता. याबाबत ‘नासा’ने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. ‘नासा’ने या आकाशगंगेचे छायाचित्र ट्विटरवर शेअर करत म्हटले आहे, ही ‘एनजीसी 2336’ आकाशगंगा पाहा. ती पृथ्वीपासून सुमारे 100 दशलक्ष प्रकाशवर्ष अंतरावर आहे. ‘हबल’ने तिचे हे सौंदर्य कॅमेऱ्यात चित्रित केले आहे. ‘नासा’ने या आकाशगंगेबाबतच्या काही रंजक गोष्टीही शेअर केल्या आहेत. ही आकाशगंगा 2 लाख प्रकाशवर्ष अंतरापर्यंत पसरलेली आहे. आकाशगंगेत अनेक विविध अनोखळी तारे आहेत. त्यांच्यामुळे ही आकाशगंगा निळसर रंगात चमकते आणि उठून दिसून येत आहे. याची प्रतिमा ही हबल या दुर्बिणीतून टिपण्यात आली आहे. तसेच आकाशगंगेच्या मध्यभागी असलेला लालसर प्रकाशमय भाग हा जुन्या तार्‍यांचा आहे. ही आकाशगंगा अनेक सर्पिलाकार भुजांनी बनलेली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:35 PM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here