समोर ठेवली विकासकामांची जंत्री; अर्थसंकल्प रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा : उदय सामंत

0

रत्नागिरी : राज्याचा अर्थसंकल्प सदर होताच विरोधकांनी कोकणाला काहीच मिळाले नाही अशी टीकेची झोड उठवली. याचा समाचार आज उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतला. कोकण हिताच्या दृष्टीने मंजूर झालेल्या विकासकामांची जंत्रीच ना. उदय सामंत यांनी पत्रकारांसमोर ठेवली. ते म्हणाले कि काल सदर झालेला अर्थसंकल्प रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. रत्नागिरी भगवती बंदर जेटी येथे क्रुज टर्मिनल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याला सुमारे शंभर कोटी इतका खर्च होणार आहे. यामुळे रत्नागिरीतील पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे. राजापूर तालुक्यातील धुतपापेश्वर मंदिराची डागडूजी करण्याबाबतचा निर्णय देखील कालच्या जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात घेण्यात आला. शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ याला ५० कोटी रुपये देण्याचा निर्णय कालच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला आहे. कुणबी समाज बांधवांची मागणी महा विकास आघाडीच्या सरकारने पूर्ण केली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड येथील कुणबी विद्यार्थ्यांसाठी मुंबईत राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी मुलुंड येथे पाच कोटी रुपये खर्च करून वसतिगृह बांधण्यात येणार आहे. याची घोषणा देखील कालच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. सिंधुरत्न योजनेअंतर्गत तीनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी वाढीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. रत्नागिरी मध्ये पन्नास कोटी रुपये खर्च करून राजीव गांधी तंत्रज्ञान पार्क उभारले जाणार आहे. रत्नागिरीतील चिपळूण येथे आयटीसी संस्था कार्यरत करणार आहे. एकूण कालचा अर्थसंकल्प रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. रत्नागिरी मतदारसंघात रस्त्याच्या कामासाठी ४६ कोटी रुपये मिळालेले आहेत. रत्नागिरी मतदार संघातील धूपप्रतिबंधक बंधारा यांसाठी ५६ कोटी मिळाले आहेत. प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी येथील विविध कामांसाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे असे ना. सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:10 PM 09/Mar/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here