वेळ येईल तेव्हा कॉल रेकॉर्ड जनतेसमोर ठेवीन : मंजिरी पाडाळकर, कुवारबाव सरपंच

0

🔳 “तक्रारदारांमधील काहीजण ठेका घेण्यास होते इच्छुक”

रत्नागिरी : कुवारबाव ग्रामपंचायतीमध्ये 14 व्या वित्त आयोगाच्या 2019-20 या वर्षात क्रीडा साहित्य पुरवठा व्यवहारात आर्थिक अपहार झाल्याचा आरोप कुवारबाव उपसरपंचांसह दहा सदस्यांनी केला आहे. मात्र त्यात काहीच तथ्य नसल्याचा खुलासा कुवारबाव सरपंच मंजिरी पाडाळकर यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की महिला सरपंच असल्यावर सरपंच फक्त सहिचा मानकरी असुन सर्व कारभार उपसरपंचांनी संभाळायचा असा उप सरपंच यांचा समज आहे. परंतू कुवारबाव सरपंच हे ग्रामपंचायत कारभार चालवण्यास स्वतः सक्षम व कार्यक्षम असल्याने उपसरपंच यांना ग्रामपंचायत कारभारामधे मनमानी हस्तक्षेप करुन स्वतःची आर्थिक पोळी भाजून घेता येत नसल्याने अश्या प्रकारचे आरोप करुन सरपंचांना बदनाम करण्यासाठी सदर तक्रार केली आहे असे सरपंच मंजिरी पाडाळकर यांचे म्हणणे आहे.
ते साहित्य, पुरवठादाराने पुरवल्या नंतर चुकीचे आलेले साहित्य पुरवठादार यांच्यासोबत झालेल्या करारा प्रमाणे सरपंच यांनी पुरवठादाराला पत्र देऊन बदलून घेण्यात आले आहे. अजुनही ते वितरित केले गेलेले नाही. तक्रार करणाऱ्यांमधील काही जण हा ठेका घेण्यासाठी इच्छुक होते. मला माहित आहे; महिला असल्यामुळे मी जर भ्रष्टाचार करायला नाही दिला तर हे होणारच आहे. वेळ येईल तेव्हा सर्व दूरध्वनि रेकॉर्डिंग जनते समोर ठेवीनच असा इशारा सरपंच मंजिरी पाडाळकर यांनी दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
07:33 PM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here