बांदा : गोव्यावरून मुंबईच्या दिशेने खासगी बसमधून बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या गुजरात येथील तिघा तरुणांवर बांदा पोलिस चेकपोस्ट येथे कारवाई करण्यात आली. या कारवाईत गोवा बनावटीच्या जवळपास १५ बँडच्या विविध दारूचा ७७,३५० रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सुरेशभाई रामजीभाई नाकरांनी (४१), हितेशभाई देवराजभाई ठुम्मर (४०), जिग्नेश अर्जुनभाई कोठडिया (२२) यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. ही कारवाई उशिरा रात्री करण्यात आली. विधानसभा निवडणूक काळात गोव्यावरून बेकायदा दारू वाहतूक केली जाते. त्यामुळे बांदा शहरात बेकायदा दारू वाहतुकीवर आळा बसविण्यासाठी गाड्यांची कसून तपासणी केली जाते. त्या पार्श्वभूमीवर बांदा चेकपोस्ट येथे कसून तपासणी केली जात होती, त्या पार्श्वभूमीवर रात्री ८ वा. च्या सुमारास एका ट्रॅव्हल्सची खासगी बस जीए इन्सुली चेकपोस्ट येथे आली असता ती तपासणीसाठी थांबविण्यात आली होती.
