खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल

0

मुंबई : सिल्वासा, दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी अखेर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. आत्महत्येत प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण आता आणखी तापणार असल्याचे चिन्ह आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. मोहन डेलकर यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आले होते, असं या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:26 AM 10-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here