देवेंद्र फडणवीसांनीच मराठा समाजाचा घात केला : नाना पटोले

0

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ‘सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांना आरक्षणासंदर्भात कुठलेही अधिकार राहिलेले नाहीत असे स्पष्ट केले. मराठा आरक्षणासंदर्भातील कायदा हा या घटना दुरुस्तीनंतर करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही शुद्ध फसवणूक असून मराठा समाजाचा घात देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. त्यामुळे आता त्यांनी केंद्राला सांगून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे’, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:05 PM 10-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here