…म्हणून मला अटकेची भीती : एकनाथ खडसे

0

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या मागे ईडी लागली आहे. यावरुन खडसेंनी भीती व्यक्त केली आहे. ‘मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाल्यानंतरच सक्तवसुली संचालनालय (ईडी) माझ्या मागे लागले. पुण्यातील भोसरीमधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात अचानक ‘ईडी’ने चौकशी सुरू केली. म्हणूनच ‘ईडी’कडून अटक होण्याची माझ्या मनात भीती आहे,’ असा युक्तिवाद राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यातर्फे काल (९ मार्च) मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. ईडीने एकदा चौकशी केल्यानंतर पुन्हा समन्स बजावल्यानंतर खडसे यांनी ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांच्यामार्फत रिट याचिका करून ईडीच्या कार्यवाहीला आव्हान दिले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:54 PM 10-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here