एसटीच्या पासांचा गोधळ

0

रत्नागिरी : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य असणाऱ्या महामंडळाच्या रत्नागिरी आगारासह विविध आगारात मासिक व त्रैमासिक पासांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह कामगारांचे नुकसान होत आहे. महामंडळाच्या गलथान कारभारामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रवासी बेठीस धरले जात आहेत. गरिबांचा रथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बसमधून मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असतात. महामंडळाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या विविध सवलतींचा लाभ अनेकप्रवासीघेतात. ग्रामीणभागातील खेड्या-पाड्यापर्यंत एसटीचे जाळे पसरले आहे. त्यामुळे वाट पाहीन पण एसटीनेच जाईन, असा विश्वास ग्रामीण भागातील प्रवाशांचा एसटीवर आहे. मात्र, एसटीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध आगारात मासिक व त्रैमासिक पासांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. रत्नागिरी बसस्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. जिल्ह्यातील विविध बसस्थानकातून मासिक व त्रैमासिक पास मोठ्या प्रमाणात प्रवासी काढत असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मासिक एसटीच्या आरक्षण केंद्रासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रवाशांनी संवाद साधला असता मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयाकडून पास उपलब्ध झाले नाहीत, असे सांगण्यात येते. पास आल्यानंतर तुम्हाला दिले जातील, अशी उत्तरे दिली जात आहेत. अनेकदा तर येथील अधिकान्यांकडून प्रवाशांना मागायचा? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्यानेच असे प्रकार जिल्ह्यात वारंवार घडत आहेत. मासिक व त्रैमासिक पासांचा तुटवडा असल्याने गेल्या काही महिन्यापासून महसूल बुडाला आहे. बाचा भूदंड प्रवाशांना बसत आहे. रत्नागिरी आगारात शुक्रवारी पास येऊनही दिले गेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना रिकाम्या हाताने घरी जावे लागले.




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here