फडणवीसांचा आणखी एक दणका, अशोक चव्हाणांवर सुद्धा आणणार हक्कभंग

0

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे बाजू मांडत महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात विशेष हक्कभंग सादर केल्यानंतर आता काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात सुद्धा हक्कभंग आणणार अशी घोषणा केली आहे. ‘सभागृहात अशोक चव्हाण यांनी आज मराठा आरक्षण संदर्भात खोटे निवेदन केले. 102 ची घटनादुरूस्ती मराठा आरक्षण कायद्याला लागू होत नाही. अॅटर्नी जनरलसंदर्भातील वक्तव्य चुकीचे केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करणार आहे’, असं फडणवीस यांनी जाहीर केलं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:22 PM 10-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here