आयपीएल २०२१ फायनलपाठोपाठ नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार ट्वेंटी-२० वर्ल्ड कप

0

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाचे वेळापत्रक नुकतंच BCCIनं जाहीर केलं. कोरोना व्हायरसमुळे गतवर्षीची आयपीएल यूएईत खेळवण्यात आली होती, परंतु यंदा ती भारतातच खेळवण्याचा निर्धार BCCIनं केला आहे. ९ एप्रिलपासून आयपीएलच्या १४ व्या पर्वाची सुरुवात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्याने होईल आणि अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर येथे होईल. आयपीएलचे यशस्वी आयोजन हे BCCIसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यंदाचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारतात होणार आहे. त्याच्या तयारीचा पाया आयपीएल आयोजनातून रचला जाणार आहे. आयपीएल २०२१साठी निवडण्यात आलेल्या सहा स्टेडियमवरच ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे सामने खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.

भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे आयोजन केले जाणार आहे. २०१६मध्ये भारतात ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे आयोजन केलं गेलं होतं. पण, यंदा कोरोना व्हायरसमुळे BCCIसमोरील आव्हानं अधिक वाढली आहेत. अशात बीसीसीआयला आयपीएलच्या यशस्वी आयोजन करावेच लागेल. सुरूवातीला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सामन्यांसाठी ८ शहरांचा विचार सुरू होता. १६ संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा ८ ठिकाणांवर खेळवण्यात येणार होती, परंतु कोरोना व्हायरसमुळे सर्व परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे आयपीएलसाठी निवडलेल्या मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, बंगळुरू व कोलकाता या सहा शहरांमध्येच ट्वेंटी-20 वर्ल्ड कप सामने खेळवण्याचा विचार सुरू आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:29 PM 10-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here