खासदार मोहन डेलकर आत्महत्येचा तपास सीबीआय कडे द्या, शिवसेना खासदार विनायक राऊत यांची मागणी

0

मुंबई : राज्यात सध्या मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी, मनसुख हिरेन मृत्यू आणि खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरुन जोरदार राजकारण सुरु आहे. मनसुख हिरेन प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करण्याची मागणी भाजपनं लावून धरली आहे. तर दुसरीकडे मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, या मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करुन त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी विनायक राऊतांनी केलीय.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:47 PM 10-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here