रत्नागिरी : गुजरात जुनागड चे खासदार मा.राजेश चुडासमा हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असतांना त्यांनी भा.ज.पा. कार्यालयाला भेट दिली. त्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी खासदार मा.राजेश चुडासमा यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व कोकणचे वैशिष्ट्य असलेली श्रीफळावर आकारलेली गणेश प्रतिमा भेट दिली. भा.ज.पा. रत्नागिरीने अनिष्ट काळामुळे दबून न जाता संघटनेची साखळी मजबूत करावी. बूथ रचना प्रभावी करावी. भा.ज.पा.चे एकेकाळी दोन खासदार होते. आज ३०० पेक्षा अधिक खासदार आहेत ही किमया भा.ज.पा. संघटनेने मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केली. यातून स्फूर्ती घेऊन रत्नागिरी भा.ज.पा.ने वाटचाल करावी. येणारा काळ हा भा.ज.पा.चा असणार आहे. यासाठी संघटना मजबुतीवर भर द्या असे भावोत्कट मार्गदर्शन खासदार मा.राजेश चुडासमा यांनी केले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:55 PM 10-Mar-21
