“ममता बॅनर्जी या फक्त निवडणुकीपुरत्या हिंदू, त्यांना मशिदीत की मंदिरात जायचं हे समजत नाही”

0

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी “भाजपाने हिंदुत्ववादाचा खेळ माझ्याबरोबर खेळू नये. मी दररोज घरातून बाहेर पडण्यापूर्वी चंडीपाठाचे उच्चारण करते” असं म्हटलं आहे. नंदीग्राम येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करताना त्यांनी असं म्हटलं होतं. यावरून आता ममतांवर निशाणा साधण्यात आला आहे. “निवडणुकीपुरत्या हिंदू” असल्याचं म्हणत बोचरी टीका करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आहे. “ममता बॅनर्जी या फक्त निवडणुकीपुरत्या हिंदू आहेत. ममता बॅनर्जी यांनी निवडणुकांच्या दडपणाखाली या स्तोत्रांचा जप केला आहे. आज दीदी चंदीपाठाचे पठण करीत आहेत. ही निवडणूक तुम्हाला काय काय करायला लावत आहे” असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांपूर्वी जरा घाबरल्या आहेत आणि त्यांना मशिदीत जायचं की मंदिरात जायचं हे समजत नाही असं देखील म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:27 PM 10-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here