सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हयातील दुर्धर आजाराने पीडित १०७ रुग्णांना जिल्हा परषदेकडून आतापर्यंत १५ लाख ७० हजार ३१ रुपये एवढी आर्थिक मदत देण्यात आली आहे. आणखी ३८ जणांचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.
कॅन्सर, हृदयरोग, किडनी रोग अशा दुर्धर आजाराने पीडित १४५ लाभार्थी रुग्णांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत. या प्रस्तावांची छाननी करून त्यापैकी आतापर्यंत १०७ प्रस्तावांना मंजुरी देऊन संबंधित लाभार्थी रुग्णांना १५ लाख ७० हजार ३१ एवढी आर्थिक मदत देण्यात आली आहे, उर्वरित ३८ प्रस्तावांपैकी २५ प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. १३ प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 3 कोटी 56 लाख 74 हजार 720 रुपयांचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले. यामध्ये 35 कोटी 52 लाख 28 हजार 650 रूपये जमा तर 31 कोटी 95 लाख 53 हजार 930 रुपयांच्या खर्चाची अपेक्षित तरतूद करण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:44 PM 10-Mar-21
