‘देवेंद्रजी तुम्हाला परत यावंच लागेल, पण अजितदादा तुम्हीपण परत या’; भाजपकडून सभागृहात खुली ऑफर

0

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगला. भाजपच्या आक्रमक बाण्यामुळे महाविकास आघाडी सरकारला बॅकफूटवर जावे लागले. ‘महाराष्ट्र वाचवण्यासाठी जी ताकद लावायची ती लावा, पण देवेंद्रजी तुम्हाला पुन्हा यावंच लागेल, अजितदादा तुम्ही पण या हरकत नाही’ अशी ऑफरच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार भाषण करत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.’आम्ही वैधानिक मंडळांचा आग्रह करत होतो. यांनी आमची कवचकुंडलं काढली. विदर्भ आणि मराठवाड्याचा १ टक्के निधी कमी केला. दादा तुम्ही अधिकाऱ्यांवर विसंबून राहू नका’, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे. ‘मला प्रश्न पडला आहे की, अजितदादा तुमच्यावर टीका करायची का नाही. कारण पुन्हा तुम्ही कधी मित्र व्हाल. महाराष्ट्र वाचवण्यासाठी जी ताकद लावायची ती लावा, देवेंद्रजी तुम्हाला पुन्हा यावंच लागेल. अजितदादा तुम्ही पण या हरकत नाही, अशी ऑफरच मुनगंटीवार यांनी दिली.तसंच, ‘कुछ देर की खामोशी है, फिरसे शोर आयेगा, तीन महिने की दूरी है, फिरसे हमारा दौर आयेगा’ असं सूचक विधानही मुनगंटीवार यांनी केलं. ‘महात्मा गांधी सेवा अनुदानासाठी २५ हजारांची तरतूद केली आहे. आज गांधीजी असते तर ते हाताची काठी घेऊन मागे लागले असते. राज्यात पहिल्यांदाच दरडोई उत्पन्न कमी झालं आहे’, अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली. ‘अनिल देशमुख यांचं वक्तव्य दुर्देवी होतं. ठाकरे सरकारला ठार करे सरकार करायचं आहे का? काही पक्षांचे चीन वर प्रेम आहे काही जणांचे सचिनवर (वाझे) प्रेम आहे. हे सरकार शरम प्रुफ आहे. आरोपींना वाचवण्यासाठी विदर्भातल्या माणसाला गृहमंत्रिपद दिले, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:55 PM 10-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here