कामथे येथे एकाचा मोबाईल लांबविला

0

चिपळूण : कामथे वेतकोंड फाटा येथे बेकरीच्या बाहेर शेडमध्ये झोपलेल्या एकाचा पाच हजारांचा मोबाईल अज्ञाताने लांबविल्याप्रकरणी अरविंदकुमार सुरेशकुमार यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दिनांक ८ मार्च रोजी ही घटना घडली. सिद्धी रसाळ यांच्या बेकरीबाहेर शेडमध्ये झोपले असता अरविंद यांचा मोबाईल अज्ञाताने चोरून नेला. या बाबत अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:37 AM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here