लखनौ-दिल्लीदरम्यान पहिली खासगी रेल्वे तेजस एक्स्प्रेस सुरू

0

लखनौ : देशातील पहिली खासगी रेल्वे तेजस एक्स्प्रेस शुक्रवारी लखनौ-दिल्ली दरम्यान धावली. लखनौ येथील चारबाग जंक्शनवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. ही रेल्वे मंगळवार वगळता आठवड्यातील बाकी 6 दिवस धावणार असून लखनौ-दिल्ली हे अंतर केवळ 6 तास 10 मिनिटांत पूर्ण करणार आहे. ही रेल्वे लखनौतून सकाळी 6 वाजून 10 वाजता सुटेल तर दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी ती दिल्लीत पोहोचेल. दिल्लीतून दुपारी 3.35 वाजता सुटून ती लखनौत रात्री 10 वाजून 5 मिनिटांनी पोहोचेल. कानपूर आणि गाजियाबाद असे केवळ दोनच थांबे या दरम्यान असणार आहेत. या रेल्वेला एक तास उशीर झाल्यास 100 रुपये, 2 तास उशीर झाल्यास 250 रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. प्रवाशांना 25 लाखांचा विमा मोफत देण्यात येणार आहे. तिकीट रद्द करण्याचे शुल्कही केवळ 25 रुपये असणार आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here