मराठा समाजाला आरक्षण तरी द्या; अन्यथा आम्हाला विष पिऊन मरु द्या : उदयनराजे

0

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासंदर्भात श्वेत पत्रिका काढावी, अशी मागणी सातत्याने लावून धरणाऱ्या भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, अथवा आम्हास विष पिऊन मरू द्या, अशी एक फेसबुक पोस्ट उदयनराजेंनी केली आहे. उदयनराजे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून सरकारला थेट इशारा दिला आहे. उदयनराजे यांची ही फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. कोरोनाने भरपूर वेळ दिला आहे. हा वेळ अन्यायाविरुद्ध झुंजत असलेल्या समाजाच्या प्रश्नासाठी द्या. तातडीने मराठा आरक्षणाचा निकाल लावा. अन्यथा खुर्च्या खाली करा, असे उदयनराजे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:52 AM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here