दक्षिण रत्नागिरी भाजपातर्फे आजपासून निधी संकलन अभियान

0

रत्नागिरी : दक्षिण रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे ११ मार्च ते ६ एप्रिल या काळात संघटनात्मक पातळीवर निधी संकलन अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली. प्रदेश भाजपाने समर्पण निधी संकलन करण्याचा दिलेला कार्यक्रम रत्नागिरीत राबवण्यात येईल. संघटनेचा खर्च समर्पण निधी संकलन करून चालवण्यात येईल. रत्नागिरीमधून २१ लाखाचा निधी संकलन करण्याचा मानस आहे. या जिल्ह्यात येणारी ५ मंडले नजरेसमोर ठेवून त्यांचा खर्च लक्षात घेऊन समर्पण निधी संकलित करण्यात येईल, असे श्री. पटवर्धन म्हणाले. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, बूथ स्तरापर्यंतच्या सर्व भाजपा सभासदांना समर्पण निधीसाठी आवाहन करण्यात येत आहे. तसेच भाजपाचे हितचिंतक, विविध आस्थापना यांनाही पक्ष निधीसाठी आवाहन करून सर्वदूर संपर्क करून ११ मार्चपासून समर्पण निधी संकलनाचे काम सुरू होईल. निधी संकलन रीतसर पार्टीच्या अधिकृत पावतीपुस्तकाच्या माध्यमातून पावती देऊन होईल. आयकराचे सर्व नियम, निकष पाळून निधी संकलन केले जाईल. रत्नागिरी भाजपाच्या बँक ऑफ इंडिया मारुती मंदिर शाखेत असलेल्या बँक खात्यामध्ये संकलित झालेला निधी जमा केला जाईल. पाच मंडलांतील कार्यालय भाडे, वीज बिल, अन्य कार्यालयीन खर्च, सेवक पगार, स्टेशनरी, वृत्तपत्रे, अभ्यागतांचे स्वागत, चहापानावर होणारा खर्च, प्रवासावर होणारा खर्च, जिल्हा बैठकांसाठी होणारा खर्च इत्यादी दैनंदिन, नैमितिक खर्च भागवण्यासाठी या संकलित निधीतून रक्कम वापरता येईल. निधी संकलनासाठी प्रत्येक मंडलात ५ सदस्यांची नियुक्ती निधी संकलन समिती काम करणार आहे. जिल्हा स्तरीय समिती त्यांची नियुक्त करणार आहे.
पूर्ण पारदर्शक पद्धतीने आणि शुचिर्भूत मार्गाने अपेक्षित २१ लाखाचा निधी संकलित होईल, असा विश्वास भाजपा श्री. पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:19 PM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here