रेल्वे प्रवासादरम्यान तब्बल अडीच लाखांची चोरी; तीन गुन्हे दाखल

0

चिपळूण : धावत्या रेल्वे गाडीतून तब्बल अडीच लाखांचा ऐवज लंपास झाल्याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईलचा त्यामध्ये समावेश आहे. नाशिक ते गोवा दरम्यान जाणाऱ्या नागपूरमडगाव फेस्टिव्हल एक्स्प्रेसमध्ये चिपळूण रेल्वे स्थानकदरम्यान दि. ६ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडल्याची फिर्याद श्रीकांत नंदकिशोर गिंडोदिया (रा. ग्रीन पार्क, धुळे) यांनी दिली आहे. श्रीकांत हे कुटुंबासमवेत ६ फेब्रुवारी रोजी नाशिकहन गोव्याकडे जात असताना दि. ७ रोजी सकाळी ६.३० च्या दरम्यान त्यांना जाग आली त्यावेळी त्यांच्या पत्नीची पर्स झोपेत असताना अज्ञाताने लांबविल्याचे लक्षात आले. यामधील १ लाख ७३ हजाराचे सोने-चांदीचे दागिने, ७० हजार रुपयांची रोख रक्कम, ६ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीस गेला आहे. दुसऱ्या घटनेबाबत किरण सुनील कुंभार (रा. बारामती) यांनी फिर्याद दिली असून ही घटना दि. २३ फेब्रुवारी रोजी घडली. किरण कुंभार हे मडगाव येथून नेत्रावती एक्स्प्रेसने प्रवास करीत असताना मोबाईल व पाकीट बॅगेत ठेवून ती सीटखाली ठेवली होती व झोपून प्रवास करीत होते. यावेळी अज्ञाताने त्यांच्या झोपेचा फायदा घेत बॅग चोरून नेली. यामध्ये त्यांचा मोबाईल व महत्त्वाची कागदपत्रे चोरीस गेली आहेत. तिसऱ्या घटनेबाबत कोमल दीपचंद्र महावर (रा. दिल्ली) यांनी खबर दिली असून, मंगला निजामुद्दीन एक्स्प्रेसने प्रवास करीत असताना चिपळूण दरम्यान २१ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. यामध्ये त्यांचा ९ हजार रुपये किंमतीचा चोरीस गेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल महावर या दि. २१ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथून मंगला एक्स्प्रेसने प्रवास करीत असता चिपळूण रेल्वे स्थानकाच्या अगोदर काही वेळ चार्जिंगला लावलेला मोबाईल अज्ञाताने लांबविल्याचे लक्षात आले. या प्रकरणी अज्ञातांवर गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत. या आधीही कोकण रेल्वेच्या हद्दीत प्रवासात करताना चोरीच्या घटना घडल्या आहेत. अशा वाढत्या घटना रेल्वेसाठी डोकेदुखी ठरली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:39 PM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here