कमी व्याज दराने कर्ज देण्याचा नावाखाली महिलेला गंडा

0

रत्नागिरी : कमी व्याज दराने कर्ज मिळवून देण्याची बतावणी करत महिलेची सुमारे २७ हजार ६५५ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ ते ९ मार्च २०२१ दरम्यान घडली आहे. दिव्या आणि अंकित शर्मा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात साक्षी दिनेश पवार (३८ रा.सिद्धिविनायक नगर, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार,या दोन संशयितांनी त्यांच्या मोबाईलवर फोन करुन ग्लोबल ऑनलाईन फायनान्स सर्व्हिसेसमधून प्रतिवर्षी ६ टक्के व्याज दराने तीन लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवले. संशयितांच्या आमिषाला बळी पडून साक्षी पवार यांनी प्रोसेसिंग शुल्क, पॉलिसी, अॅडव्हान्स हफ्ता व जीएसटीच्या नावाखाली २७ हजार ६५५ रुपये ऑनलाईन भरले होते. त्यात फसवणूक झाली आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:52 PM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here