“२ मे नंतर महाराष्ट्रात सत्तेचा प्रलय नक्कीच होईल”

0

मुंबई : राज्यातील सत्तापालट निश्चित असून जनहितविरोधी सरकार टिकवणं ही सर्वात मोठी घोडचूक आहे असं विधान भाजपाचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना मुनगंटीवारांनी राज्यात ३ महिन्याने सत्तांतर होण्याचा दावा केला होता. यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मुनगंटीवारांना टोला लगावला होता. त्यानंतर आता पुन्हा सुधीर मुनगंटीवारांनी पुनरुच्चार केला आहे की, शुभ कार्य कधी ना कधी व्हायचं, जनहितविरोधी सरकारला अधिवेशन घ्यायचं नाही, जर तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षभरात ११६ तास ३९ मिनिटे अधिवेशन झालं, यावेळी ४७ तास अधिवेशन झालं. शेकडो प्रश्न कोरोनाच्या संकटानंतर महाराष्ट्रासमोर तयार झाले, १ मे १९६० नंतर महाराष्ट्रात असाधारण परिस्थिती आहे, त्यात फक्त सूडाचं राजकारण ठाकरे सरकारकडून केले जात आहे. असा आरोप त्यांनी केला. तसेच एखादा प्रश्न उपस्थित केला तर मोहन डेलकरांची आत्महत्या सांगायची, आश्चर्य वाटतं, वीजबिलावर चर्चा नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा नाही, सरकारी इमारतीत जे भाडेकरू आहेत त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे असं सरकार टिकवणं हे सुद्धा राजकीय दृष्टीने आमच्या हातून सर्वात मोठी घोडचूक आहे, तीन महिन्याचे चार महिने होतील पण हे सरकार टिकवणं घोडचूक आहे. जनतेने महाविकास आघाडी सरकारला निवडून दिलं नाही, जनतेने भाजपा शिवसेनेचे १६१ आमदार निवडून दिले. बेईमानी केली, काँग्रेस-राष्ट्रवादीचे ९८ आमदार आहेत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती, पण आमच्या लक्षातच आलं नाही की अशाप्रकारे बेईमानी होऊ शकते अशा शब्दात सुधीर मुनगंटीवारांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे. दरम्यान, प्रयत्न करणाऱ्यांचा कधी पराभव होत नाही, जनहितविरोधी राजकारण होत असेल तर शक्तीने लढावं लागेल, तत्परतेने पुढे जावं लागेलच, सूडाचं राजकारण वाढतं तेव्हा सत्तेचा प्रलय नक्कीच होतो, पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राती सरकारच्या चूकांचे वजन भरलंय असं समजून चाला, असं म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी २ मेनंतर महाराष्ट्रात राजकीय उलाथापालथ होण्याचा दावा केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:52 PM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here