अधिवेशन आणि लग्न होतात मग एमपीएससी परीक्षा का नाही; महाविकासआघाडी सरकारला घरचा आहेर

0

पुणे : राज्यात अधिवेशन, आरोग्य विभागाची भरती आणि मोठमोठे लग्नसमारंभ पार पडतात. मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात काय अर्थ आहे, असा सवाल विचारत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकासआघाडी सरकारला घरचा आहेर दिला. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आणि विद्यार्थ्यांच्यादृष्टीने अन्यायकारक असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. एमपीएससी परीक्षा लांबणीवर पडल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एका वृत्त वाहिनीशी संवाद साधला. एमपीएससी परीक्षेबाबत अशाप्रकराची अनिश्चितता योग्य नाही. विद्यार्थ्यांनी आणखी किती दिवस अभ्यास करायचा. राज्यात अधिवेशन आणि लग्नसमारंभ पार पडतात. मग एकट्या विद्यार्थ्यांनाच शिक्षा देणे योग्य नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. हे विद्यार्थी भावी प्रशासकीय अधिकारी आहेत. ते परीक्षेच्यावेळी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करतील, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:19 PM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here