ज्येष्ठ समाजसेविका कुमुदताई रेगे यांचे निधन

0

लांजा : थोर विचारवंत, समाजसेविका, लांजा महिलाश्रम संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा, विश्वस्त कुमुदताई रेगे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबई येथे वृद्धापकाळाने रविवारी पहाटे निधन झाले.

HTML tutorial

कोकणचे गांधी पू. आप्पासाहेब पटवर्धन यांच्या कार्याने प्रेरित होऊन कुमुदताई यांनी आपले आयुष्य समाजातील शोषित, दुर्बल आणि वंचित घटकांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी घालवले. त्यांनी सामाजिक क्षेत्रात झोकून देऊन केलेले हे काम उल्लेखनीय ठरले आहे.

लांजातील कै. श्रीमती जानकीबाई (आक्का) तेंडुलकर महिलाश्रम संस्थेच्या स्थापनेत मोलाचा वाटा आणि पुढाकार घेतलेल्या कुमुदताई यांचे सामाजिक कार्य उत्तुंग असेच होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here