‘या हल्ल्यात मला गंभीर दुखापत, व्हीलचेअरवर करणार प्रचार’ : ममता बॅनर्जी

0

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रुग्णालयातूनच आपल्या समर्थकांसाठी एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे. ममता व्हिडीओत म्हणाल्या आहेत की, ‘बुधवारी झालेल्या हल्ल्यात मला गंभीर दुखापत झाली आहे. ज्यामुळे हातापायात खूप वेदना होत आहेत.’ त्या म्हणाल्या, ‘काही दिवसात मी रुग्णालयातून बाहेर येईल आणि व्हीलचेअरवरून प्रचारास सुरुवात करणार.’ सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी समर्थकांना केले आहे. त्या लवकरच रुग्णालयातून बाहेर येईल, अशी अशा त्यांनी व्यक्त केली आहे.

कोलकाताच्या एसएसकेएम रुग्णालयाने ममता बॅनर्जी यांचे हेल्थ बुलेटिन काही वेळेपूर्वी जाही केले होते. ज्यानुसार, ममता बॅनर्जी यांच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. रुग्णालयात ममता बॅनर्जी यांचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. रुग्णालयाचे म्हणणे आहे की, ममता बॅनर्जी यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे. रुग्णालयात 6 डॉक्टरांची टीम ममता बॅनर्जी यांच्या आरोग्यावर नजर ठेवून आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:56 PM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here