“फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना होणार…”, नितेश राणेंचा सणसणीत टोला

0

मुंबई : पुण्यात विद्यार्थ्यांनी एमपीएससी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, बंद करा बंद करा, एमपीएससीचे गाजर दाखवणे बंद करा यासारखी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर संताप व्यक्त करण्यात आला. येत्या १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावाचे कारण देत पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. यावरून अनेकांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. याच दरम्यान भाजपाचे नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

नितेश राणे यांनी “फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना होणार… रात्रीच्या पार्टीमध्ये नाही?” असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “MPSC च्या परीक्षा परत पुढे ढकलल्या.. परीक्षेला बसणाऱ्या मुलांचे वय वाढत चालले आहे. मुलांचे वय कसे कमी करणार? यांची मुले परीक्षेला बसली नाही म्हणून वाटेल ते निर्णय घेत आहेत!!! फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना होणार… रात्रीच्या पार्टीमध्ये नाही??” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:56 PM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here