थकबाकीदार वीजग्राहकांनी सक्षम अधिकारी यांच्याकडूनच हप्त्याची सवलत घ्यावी

0

रत्नागिरी : महावितरण या जनतेच्या मालकीच्या कंपनीचे वीज बिल थकीत ठेवणाऱ्या वीज ग्राहकांच्या वीज पुरवठा खंडित करण्याबाबत माननीय ऊर्जा मंत्री यांनी विधानसभेत निवेदन सादर केले आहे व त्या अनुषंगाने अनेक सवलती देऊन देखील जे ग्राहक वीज बिल भरणा करत नाहीत त्यांची वीज नाईलाजाने खंडित करण्याची कारवाई सुरू झाली आहे. तथापि काही वीज ग्राहक थकबाकिसाठी वीज तोडण्यासाठी येणाऱ्या कामगारांकडून हप्ते द्यावे, आत्ता हे पैसे घ्या बाकी नंतर बघू असे म्हणत हुज्जत घालत असतात. परंतु हप्त्याची सवलत देण्याचे अधिकार उपकार्यकारी अभियंता, उपविभाग प्रमुख यांना असतात. या सवलतीसाठी थकबाकीदार वीज ग्राहकांनी मंजुरी घेतली तरच त्यानुसार हप्ते मिळू शकतील. यामुळे कारणाशिवाय आपल्या दारात आलेल्या वीज कर्मचाऱ्यासोबत वादविवाद करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:12 PM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here