रत्नागिरी : मैदानावरील खो-खो खेळाडूंचा राबता पाहता भविष्यात ज्युनिअर, सब ज्युनिअर गटातील राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये रत्नागिरीचे भविष्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव यांनी केले. डॉ. जाधव यांच्यासह महाराष्ट्राचे सचिव अॅड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, डॉ. प्रशांत इनामदार, जयांशू पोळ, आंतरराष्ट्रीय पंच नानासाहेब झांबरे, राष्ट्रीय प्रशिक्षक बिपिन पाटील, जगदिश नाणजकर, शरद व्हनखडे, भाऊ कोळी, मंदार कोळी, दलेश देसाई, प्रविण बागल यांच्यासह अन्य पदाधिकारी रत्नागिरी दौर्यावर होते. यावेळी रत्नागिरीतील छ. शिवाजी महाराज क्रीडागंणावरील आर्यन क्लबच्या सराव मैदानावर सर्व पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. जाधव यांनी खेळाडूंशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, एकेकाळी कोकणातील जिल्हे खो-खोमध्ये मागे होते; परंतु रत्नागिरीने भरारी घेतली असून ऐश्वर्या सावंत, आरती कांबळे, श्रध्दा लाड, अपेक्षा सुतार, गौरी पवार यांच्यासारखे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणारे खेळाडू तयार झाले आहेत. हे यश निश्चितच वाखाण्याजोगे आहे. दरम्यान, रत्नागिरीशी आपले अनोखे ॠणानुबंध आहेत. राष्ट्रीय प्रशिक्षण म्हणून याच ठिकाणाहून सुरवात झाल्याचा दाखला देतानाच राज्याचे माजी सचिव आणि जिल्ह्यातील खो-खो आधारस्तंभ संदिप तावडे यांचा डॉ. जाधव यांनी गौरव केला. तावडे यांच्यासह विनोद मयेकर, राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे, राजेश कळंबटे यांनी मैदानासाठी दिलेल्या योगदानाबद्दल अभिनंदन केले. तसेच रत्नागिरीतून महाराष्ट्र खो-खो संघाला अनेक चांगली रत्न मिळवून दिल्याचे मत सचिव अॅड. शर्मा यांनी व्यक्त केले. तसेच तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या पुढील कारकीर्दीला शुभेच्छा दिल्या
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:19 AM 12-Mar-21
